Admission Procedure

संकलित पदवी व पदव्युत्तर प्रवेश नियम व प्रक्रिया

  1. पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व प्रवेश गुणवत्तेच्या आधारे देण्यात येतील.
  2. विहित मुदतीत आपली नावे नोंदविले अर्जंदारच प्रवेशास पात्र ठरतील.
  3. मान्य प्रवेश क्षमतेपैकी ५२ टक्के जागा शासन नयमानुसार मागासवर्गींय विद्यार्थ्यांसाठी राखीव व खुला संवर्ग यात महिलासाठी ३० टक्के जागा आरक्षित राहतील.
  1. पदवी स्तरावरील विहित प्रवेश क्षमतेपैकी ८५ टक्के जागा गुणवत्तेच्या आधारे भरण्यात येतील. शिक्षण संस्था व प्राचार्य यांना प्रत्येकी ५ टक्के जागा आपल्या अधिकारातून भरता येतील. आणि उर्वरीत ५ टक्के जागा क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नसतील तर वरील जागावर शिक्षण संस्थाचालक व प्राचार्य यांच्या सल्ल्याने प्रवेश देण्यात येईल.
  2. ८५ टक्के जागा गुणवत्तेनुसार भरण्यात येतील.
  3. ५ टक्के जागा संस्थेच्या अधिकारात असतील.
  4. ५ टक्के जागा प्राचार्यांच्या अधिकारात असतील.

५ टक्के जागा क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष नैपुण्य संपादन केलल्या विद्यार्थ्यांसाठी राखिव असतील.

५.  स्वांतत्र्य सैनिकाचे पाल्य व आजी, माजी सैनिकाचे पाल्य, प्रकल्पग्रस्ताचे पाल्य, व अंपग या सर्व सवंर्गाना मिळून विहीत अभ्यासक्रम निहाय प्रवेश क्षमते व्यतिरीक्त वाढीव जागावर प्रवेश देता येईल ही तरतूद फक्त पदवी वर्गासाठीच लागू राहील.

  1. प्रवेश घेताना द्यावयाची कागदपत्रे
  2. मुळ टी. सी. आणि त्याच्या ३ सत्यप्रती.
  3. मुळ गुणपित्रका (अर्थांत जे विद्यार्थीं एकापेक्षा अनेक प्रयत्नांत उत्तीर्ण झाले त्या सर्व गुणपत्रिका) त्याच्या ३ सत्यप्रती.
  4. शैक्षणिक वर्ष २०१४१५ पासून प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेते वेळेस प्रवेश अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रासह आधार कार्डची १ सत्यप्रत व भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्र.) देणे अनिवार्य आहे.
  5. ११ वी १२ वी च्या विद्यार्थींनींना पालकाच्या निवेदनाचे (प्रतिज्ञा पत्र) दोन प्रती भरून देणे आवश्यक आहे.
  6. विद्यार्थ्यांनी इ. बी. सी. फॉर्म सोबत अपत्याचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
  7. प्रथम वर्षांसाठी (बी.ए./बी. एस्सी/बी. कॉम/एम. ए. /एम. एस्सी) प्रवेश घेतांना योग्यता प्रमाणपत्र ( ) भरून देणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
  8. पासपोर्ट साईजच्या रंगीत दोन फोटो द्याव्यात.
  9. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनूसार द्यावे लागेल.
  10. शिष्यवर्ती धारक विद्यार्थ्यांना संबंधीत जातीच्या प्रमाणपत्राच्या तीन सत्यप्रती प्रवेश अर्जासोबत देणे आवश्यक आहे.

शैक्षणिक खंड (गॅप) असेल तर गॅप सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे.

नोट : एकदा कार्यालयात दाखल केलेली कागदपत्रे कोणत्याही परिस्थित परत दिले जाणार नाहीत

विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वींच टी. सी. व मार्कमेमोच्या सत्यप्रती जादा तयार करून घेवून स्वतःजवळ ठेवाव्यात. एकदा ओळखपत्र दिल्यानंतर दुसर्‍यांदा ओळखपत्र दिले जाणार नाही.